काँग्रेस पक्षाने सहकार चळवळ गरिबांपर्यंत पोहोचूच दिली नाही
सुभाष देशमुख : ग्रामीण भागात विविध ठिकाणी दौरे
सोलापूर ( कटूसत्य वृत्त ):- कॉंग्रेसने सहकार चळवळीचा फायदा गरिबांना कधी मिळू दिला नाही. फक्त मूठभर लोकांसाठीच वापर केला. गरिबांचे कल्याण करण्यासाठी सहकाराचा
वापर न करता फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला, अशी टीका दक्षिण सोलापूर विधानसभा मतदासंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केली.
आमदार देशमुख यांनी गुरुवारी मतदार संघातील डोणगाव, मनगोळी, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, कंदलगाव, अंत्रोळी, वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, विंचूर, निम्बर्गी, औराद गावांना भेट देऊन कॉर्नर बैठका, सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
आमदार देशमुख पुढे म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून आपण गावागावात आर्थिक चळवळ उभा केली. कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिले. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या बेछूट आरोपाला ग्रामीण भागातील मतदार उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीर उभे आहे. महायुतीने सत्तेत आल्यावर
शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ केली जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्धारही केला आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होणार आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष राम जाधव, महिला तालुकाध्यक्ष वृषाली पवार, सरपंच राजश्री आमले, नामदेव पवार, अप्पासाहेब मोटे, संजय भोसले, सर्जेराव पाटील, रेवनसिद्ध खजुरकर, अण्णासाहेब पाटील, मनोज सुरवसे, विश्वनाथ गायकवाड, अप्पा स्वामी, नानासाहेब कोलते, बाबा आमले, अमोल पाटील, ज्ञानेश्वर कुरुंद, ज्ञानराज कुलकर्णी, रमेश असबे, बाबूराव क्षीरसागर, अण्णा पाटील, मीनल माने, बाळासाहेब पवार, दयानंद माने, शशिकांत कोळी, सोपान भडकुंबे, तालुकाध्यक्ष संगपा केरके, प्रशांत कडते, वैभव कुलकर्णी, अंबिका पाटील, महादेव हणमाने, शरीफ शेख, श्रीकांत बनसोडे, तुकाराम शेजाळ, यतीन शहा, बिपीन पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments