Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून येणार

 राज्यात महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून येणार


आमदार रोहित पवार ; अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ भोसे, मोडनिंब येथे प्रचार सभा
माढा : (कटुसत्य वृत्त)
राज्यात महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून येणार असल्याचा आशावाद आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.


माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ मोडनिंब येथे सभेत ते बोलत होते.

आमदार पवार म्हणाले की, सत्ताधारी सरकार महाराष्ट्राचे नाही तर गुजरातच्या हिताचे काम करत आहेत. महाराष्ट्राचे भविष्य चांगले राहिले पाहिजे यासाठी शरद पवारांचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पवार विरुद्ध मोदी अशी आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला जनतेचे मोठे पाठबळ मिळत असल्याने महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून येतील आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. अभिजित पाटील यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. या मतदारसंघात ऊस आणि पाण्यावर राजकारण केले जात आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणले
जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कारण नाही.

अभिजित पाटील यांचा कारखाना तुमच्या मदतीला आहे. याचबरोबर माझ्याही कारखान्याच्या माध्यमातून अडचणी दूर केल्या जातील, असा विश्वास त्यांनी दिला. येथील लोकप्रतिनिधी शरद पवारांना सोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांच्या 'घड्याळा'कडे गेले. मात्र 'घड्याळा'ची वेळ वाईट सुरू असल्याने त्यांनी त्यांचीही साथ सोडली.


सीना-माढा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करेन
सीना-माढा प्रकल्प बंद पडेल असे सांगितले जात आहे. मात्र मी आमदार झाल्यावर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करेन, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन, शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी मोडनिंब मार्केट कमिटीची सुधारणा करेन, मोडनिंब येथे एमआयडीसी उभारण्यात येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments