आमदार मानेंच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
अंकोली येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार आ. यशवंत माने.
• मोहोळ : (कटुसत्य वृत्त)
अंकोली व परिसरात मोहोळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रचार सभांना मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मोहोळ तालुक्यातील शेजबाभूळगाव, अंकोली आणि औढी आदी गावांत 'संवाद जनतेशी, आपल्या माणसांशी' या उपक्रमांतर्गत माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाल्या. यावेळी गावकऱ्यांनी राजन पाटील आणि यशवंत माने याचे जल्लोषात
स्वागत केले. गावाकऱ्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून पाटील आणि माने भारावून गेले. आम्ही मतदार पुन्हा विकासाच्या पाठीशी आहोत, आमचे मतदान 'घड्याळा'लाच असा निर्धार
मतदारांनी प्रचार सभांवेळी केला. या प्रचार दौऱ्यावेळी शेतकरी, कष्टकरी, ग्रामस्थ, महिला, युवती तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
आ. माने यांनी गेल्या चार- साडेचार वर्षांत मोहोळ मतदारसंघात विकासकामांसाठी तब्बल ३५०० कोटींचा निधी आणला. या मतदारसंघाच्या विकासकामांतून चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील राहिलेल्या विकासकामांसाठी आमदार यशवंत माने यांना मताधिक्याने पुन्हा निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी
सन २०१९ च्या निवडणुकीत भरघोस मते देऊन मला निवडून दिले. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. यापुढे मला या मतदारसंघात सर्वांगीण विकास साधायचा आहे. तेव्हा पुन्हा एकदा मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन आमदार माने यांनी केले.
0 Comments