Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.हुलगेश चलवादींची प्रचारात आघाडी मतदारांकडून मिळतोय 'विजयी भव:' चा आशिर्वाद

प्रेस नोट
  
डॉ.हुलगेश चलवादींची प्रचारात आघाडी 
मतदारांकडून मिळतोय 'विजयी भव:' चा आशिर्वाद








वडगाव शेरी मतदारसंघात यंदा तिहेरी लढत बघायला मिळतेय. प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात बहुजन समाज पक्षाचे तगडे आव्हान विधानसभा निवडणुकीत राहणार आहे.बसपाने यंदा पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, पुण्याचे माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांना मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे.जनतेला समस्यांच्या चक्रव्युहातून बाहेर काढण्याचा निर्धार डॉ.चलवादींनी केला आहे.विविध भागांना भेटी देत मतदार संघातील जानत्या मतदारांसोबत चर्चा करीत 'भैय्यांची गॅरंटी' घरोघरी पोहचवण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. यानिमित्ताने डॉ.चलवादींनी प्रचारासी मतदारांच्या मनामध्ये देखील  विजयी आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मतदारांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्या आणि लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेत आहे, असे यावेळी बोलतांना डॉ.चलवादी म्हणाले.विद्यमान आमदारांनी दिलेल्या अनेक आश्वासनांची पुर्तता करण्यात आलेली नाही. या आश्वासनांची पुर्तता करू, असा विश्वास देखील डॉ.चलवादी मतदारांना देत आहेत. लोकसहभागातून झालेला विकास हा सर्वकर्षी असतो, या भावनेतून 'सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय' या विचाराने प्रेरणा घेत सर्वसामान्यांना विकासगंगेचा मुख्य आधार करू,असे डॉ.चलवादी म्हणाले.

चंदननगर सह अनेक भागात केलेल्या दौर्यातून आतापर्यंत मतदारांनी समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर मांडला.या समस्येची सोडवणूक करण्याच्या दिशेने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला असल्याने सर्वसामान्यातून आलेल्या नेतृत्वाला यंदा मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. 'विकसित वडगावशेरी, समृद्ध वडगावशेरी' या संकल्पनेचा अवलंब करीत सर्वसामान्य उमेदवारच 
'१००% विकासकारण' शकतो. शोषित, पीडित, उपेक्षितांसह सर्वजनांच्या कल्याणासाठी केवळ बहुजन समाज पक्षच योग्य पर्याय असल्याचा विश्वास यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments