Hot Posts

6/recent/ticker-posts

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास- महादेव कोगनुरे

 ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास- महादेव कोगनुरे

 भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- किल्लेदार मंगल कार्यालय ते नेहरू नगर बस स्टॉप पर्यंत निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे, माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सोमवारी (ता. १८) शहरात जोरदार पदयात्रा काढली. किल्लेदार मंगल कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे आसरा चौक, डी मार्ट, के एल इ समोरील मेन रोड, गोविंद श्री मंगल कार्यालय चौक, दावत चौक भारती विद्यापीठ संत रोहिदास चौक नेहरूनगर मार्गे नेहरूनगर बसस्टॉपवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

या पदयात्रेदरम्यान, ढोल, ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. ठिकठिकाणी महिलांनी महादेव कोगनुरे यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशिर्वाद दिले. गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पटके घालून हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. लांबच लांब पदयात्रेचे चित्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. पदयात्रेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सर्वांना अभिवादन केले. अभिवादनासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबले होते. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केले.

मतदान यंत्रावर चार क्रमांकावर मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन हे चिन्ह मतदान यंत्रावर (ईव्हीएम) चार क्रमांकावर आहे. महादेव कोगनुरे यांचा फोटो आणि त्यापुढे रेल्वे इंजिनचे चिन्ह असून त्यासमोरील बटण दाबून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन पदयात्रेदरम्यान करण्यात आले.


मतदारांचे प्रेम हीच विजयाची खात्री

यापूर्वीही शहरी आणि ग्रामीण भागात पदयात्रा, कॉर्नर सभा, गावभेट दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी शहरात झालेल्या पदयात्रेला ज्या पद्धतीची गर्दी होती त्यातून माझ्यावरचे मतदारांचे प्रेम दिसून येते. त्या प्रेमामुळेच मला विजयाची खात्री आहे अशी प्रतिक्रिया महादेव कोगनुरे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments