Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर निवडणूक कार्यालयाला निवडणूक निरीक्षक सुबोधकुमार यांची भेट

 पंढरपूर निवडणूक कार्यालयाला निवडणूक निरीक्षक सुबोधकुमार यांची भेट


   पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक सुबोधकुमार, भा.प्र.से  यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट दिली व निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

       तसेच निवडणूक निरीक्षक सुबोधकुमार यांनी स्ट्रॉंग रूम, नियोजित मतमोजणी कक्ष यांची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेबाबत  माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या.यावेळी पंढरपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजाबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी  दिली.

            यावेळी 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे, मदन जाधव तसेच निवडणूक निरीक्षक सुबोधकुमार यांचे संपर्क अधिकारी अमित  निमकर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments