Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास महादेव कोगनुरे; दक्षिण सोलापुरात विजापूर रोड मनसेच्या पदयात्रेला गर्दी

 मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास महादेव कोगनुरे; 

दक्षिण सोलापुरात विजापूर रोड मनसेच्या पदयात्रेला गर्दी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही. तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते. आता मतदार संघाचा विकास करणे हाच ध्यास घेऊन मी निवडणुकीत आहे. जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले.

सोलापूर दक्षिण मतदार संघात विजापूर रोड शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता परिवर्तन हवे आहे, प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी साडेआठ वाजता रेवणसिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरूनगर कमला नगर सुशील नगर माशाळ वस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा झाली. 

पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे जोरदार स्वागत करत होते. उमेदवार महादेव कोगनूरे हे सर्व बंधू-भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते.



कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास शहरासह ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महादेव कोगनूरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. प्रस्थापितांना गाडून प्रामाणिक जनसेवक असलेल्या महादेव कोगनुरे यांना जनता आमदार करेल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments