निवडणूक पार्श्वभूमीवर नातेपुते शहर व परिसरात पोलिसांचा रूट मार्च
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नातेपुते पोलिस प्रशास सज्ज झाले आहे. त्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यानुषंगाने पोलिस ठाणे स्तरावर मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढण्यात आला. गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलिस अनेक उपाययोजना करत आहेत. नातेपुते शहर व परिसरात पोलिस ठाण्याचे हद्दीमध्ये ठाणे स्तरावरील महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला. यामध्ये नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे सीआयएसएफचे अधिकारी व पोलिस ठाणेचे अधिकारी, पोलिस दलाचे जवान, होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक यांचा समावेश होता.
चौकट :
कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. कोणतीही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जर कोणी सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर नातेपुते पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा.
महारुद्र परजणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे
0 Comments