Hot Posts

6/recent/ticker-posts

अनेक पक्षातून फिरून आलेल्याला जनताच शिकवेल धडा- अमोल कोल्हे

 अनेक पक्षातून फिरून आलेल्याला जनताच शिकवेल धडा- अमोल कोल्हे




खा. अमोल कोल्हेंकडून भगीरथ भालकेच्या उमेदवारीची खिल्ली

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून एकीकडे महायुतीचा भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामध्येच काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आणि सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याने महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत व पुरस्कृत असा उमेदवार कोण असा संभ्रम पूर्ण मतदार संघामध्ये तसेच मतदारसंघातील जनतेला पडला होता.

हा संभ्रम दूर करण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या लिंक रोड, पंढरपूर, या निवासस्थानी शिरुरचे खासदर अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद पार पडली. 

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमोल कोल्हे यांनी काँग्रेस पक्षाचा जी उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवाराचं नेमकं दल (पक्ष) कोणता आहे अशा शब्दात खिल्ली उडवत असताना स्व.भारत भालके हे निष्ठेने काम करणारे काँग्रेसचे पदाधिकारी होते परंतु त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी अनेक पक्षातून आपल्याला कोठे काही मिळते का यासाठी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असे जाऊन आपली पोळी कुठे भाजते का तसेच जनतेचे किंवा विकासाचे यांना काही घेणेदेणे नसून फक्त आपली सत्ता कशी येते याकडे यांचे लक्ष असल्याचे सांगत भगीरथ भालके यांच्यावरती तुमचा पक्ष कोणता व अनेक पक्षातून फिरून आलेल्या व उमेदवारास जनतेने साथ कशी द्यावी यावर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पुढील काळामध्ये आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार हा फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनिल सावंत हेच असतील असे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते राहुल शाह, संभाजी ब्रिगेडचे नेते दीपक वाडदेकर, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, रवी पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments