आरोग्य विज्ञान विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल
आणि स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन
नाशिक: - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस शपथचे वाचन केले. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सभागृहात उपस्थितांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. याप्रसंगी श्री. सुमित काकड, श्री.बी.टी. भांड, श्री. दिपक कटारे, श्री. संदीप घागरे, श्री. नंदु आहेर, श्री. मनोहर देवरे, श्री. निलेश पाटील, श्री. संजय तिखे, श्री. रामदास गडाख, श्री. वैभव ढवळे, श्री. गौरव देवरे, श्री. पंढरीनाथ कोल्हे आदी अधिकारी व कर्मचारी मोठया उपस्थित होते.
0 Comments