Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी कुमार नाणेकर यांनी काढलेल्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन चर्चेत

 महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी कुमार  नाणेकर यांनी काढलेल्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन चर्चेत    


शरदचंद्र पवार पक्षाचे माननीय संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री देवदत्त निकम यांनी आंबेगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित जाहीर सभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचे निकटवर्ती कुमार महाराज नाणेकर यांनी शेकडो टू व्हीलर गाड्यांची रॅली काढत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडो युवकांना घेऊन दाखल झाले

 निकम यांची उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या जाहीर सभेत मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय उपस्थित होता यावेळी पुन्हा एकदा गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला.
अनेक गावचे सरपंच पदाधिकारी यांनी देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली.
देवदत्त निकम हे शेतकरी पुत्र असून
नागापूरचे सरपंच.त्यांंनी चौतीस वर्ष समाजकारण,राजकारण व सहकार क्षेत्रात  काम केले आहे भिमाशंकर सह.साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर काम  करताना अत्यंत अडचणीतून  काटकसर करून कारखाना चांगल्या सुस्थितीत आणून देशपातळीवर एक नंबरचा कारखाना म्हणून पारितोषिक मिळवलं आहे 
कृषिउत्पन्न बाजार समितीत सभापती पदावर काम करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करुन देशातील पहिली डिजीटल बाजार समिती म्हणून नावलौकिक मिळवल आहे 
त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2014 ला  मा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली. 
2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटला आणि शरद पवारांना चाळीस आमदार सोडून गेले.
अशा परिस्थितीत देवदत्त निकम यांनी एकनिष्ठ राहून शरद पवारांना साथ दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संसदरत्न खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात देवदत्त निकम यांची उल्लेखनीय कामगिरी ठरली.
त्याच अनुषंगाने 20नोव्हेंबर 2024मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुतारी चिन्ह देऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून  देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments