बँकांच्या आर्थिक वृद्धीसाठी गोपनीयता व विश्वासार्हता महत्वाची- सौरभ मिरीकर
.png)
माढेश्वरी बँकेच्या 6 दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकांना आपल्या बँकेकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना विनम्र व तत्पर सेवा देऊन पारदर्शक व्यवहार केले पाहिजेत.बँकेच्या आर्थिक वृद्धीसाठी गोपनीयता व विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे अधिकारी किंवा कर्मचारी यांनी रिझर्व बँकेने सांगितलेले नियम, अटी,तरतूदी व आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवूनच कामकाज केले पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील इलाईट बॅंकींग अकॅडमीचे तज्ञ मार्गदर्शक सौरभ मिरीकर यांनी केले आहे.ते माढा येथील माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या 6 दिवशीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या वेळी बोलत होते.प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले.अध्यक्षस्थानी बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत होते.यावेळी बँकेचे संचालक तथा सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले की, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपापले ज्ञान अपडेट व अपग्रेड ठेवणे आवश्यक आहे.बँकेचे ग्राहक हे दैवत म्हणून त्यांना सेवा दिल्यास ठेवी,कर्जवाटप व वसुली यामध्ये नक्कीच वृद्धी होऊ शकते.सध्या बँकेकडे 230 कोटींच्या आसपास ठेवी आहेत हे प्रमाण 500 कोटींपर्यंत वाढविण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की, बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. सर्व सभासद व ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहून पारदर्शक पद्धतीने कामकाज सुरू आहे त्यामुळे सातत्याने बँकेची आर्थिक वृद्धी होत आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे करावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बँकेचे संचालक प्रा. डॉ.गोरख देशमुख,गणेश काशीद,तज्ञ मार्गदर्शक राहुल कदम,सुनील बामणे, सहव्यवस्थापक नंदकुमार दुडम,वसुली अधिकारी राजकुमार भोळे,निलेश कुलकर्णी,लक्ष्मण शिंदे,जयंत खुर्द,शिवाजी घाडगे, बाळासाहेब पवार,अमोल मारकड,अंबादास गुत्तीकोंडा, प्रमोद शिंदे,विक्रम पाटील यांच्यासह बँकेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments