सोलापूर शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या
.png)
किसन जाधव यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्रकान्वये मागणी
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी होम मैदान येथील आयोजित महिला सशक्तिकरण कार्यक्रमानिमित्त सोलापूरात आले होते. यावेळी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री यांना गुलाबी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, नगरसेवक आनंददादा चंदनशिवे, महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, सरोजिनी जाधव, संगीता गायकवाड, शोभा गायकवाड, रुक्मिणीताई जाधव प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार,लक्ष्मी पवार आदींसह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य यांचे उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून मिळावी यासाठी पत्रकान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्परता दाखवत लवकरात सोलापूर शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष बांधणीवर आपण भर द्यावा येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असून सर्वांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
0 Comments