वंचितचां उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 28, 2024

वंचितचां उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

 वंचितचां उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे  राजीनामे

अकलूज (कटूसत्य वृत्त):-वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुका,यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघातील  वंचितचां उमेदवार,  राज कुमार हे बदलून मिळावेत, यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली होती. मात्र वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असून, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी अकलूज येथे पत्रकार परिषद घेत जाहीर राजीनामे दिले आहेत.

          यावेळी माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपुर, पिलिव,अकलूज,चांदापुरी,बचेरी आदी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांनी राजीनामे सादर केले. तसेच २३ आक्टोंबर रोजी नवनियुक्त १० पैकि ५ पदाधिकारी यांनी जाहीर राजीनामे दिले आहेत.हे सर्व राजीनामे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना सादर केले असून, त्यामध्ये वरिष्ठांनकडून गळचेपी होत असल्याने निषेध म्हणून राजीनामे देत असल्याचे नमूद केले आहे.

          या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड.सुमित सावंत,जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलगार,माजी तालुका अध्यक्ष अभिजित जगताप,मा.तालुका उपाध्यक्ष समाधान साबळे,अक्षय देठे,लिंगेश्वर सातपुते,सागर सरतापे,विकास दळवी,मनोज जगताप,सुहास गायकवाड,शुभम वाघमारे, सुनील कांबळे,आदर्श गायकवाड,अजय कांबळे,जय खरे,कुंडलिक कांबळे,रामजी लोंढे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages