माळशिरस विधानसभा मतदारसंघातील वंचितचा उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे जाहीर राजीनामे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 27, 2024

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील वंचितचा उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे जाहीर राजीनामे

 माळशिरस विधानसभा मतदारसंघातील वंचितचा उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे जाहीर राजीनामे



अकलूज (कटूसत्य वृत्त):- वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याने वंचित चां जाहीर उमेदवार राज कुमार हे बदलून मिळावा, यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली मात्र वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर राजीनामे दिले आहेत.
          यावेळी माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपुर, पिलिव,अकलूज,चांदापुरी,बचेरी आदी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांनी राजीनामे सादर केले, तसेच २३ आक्टोंबर रोजी नवनियुक्त १० पैकि ५ पदाधिकरी यांनी जाहीर राजीनामे दिले आहेत.हे सर्व राजीनामे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना सादर केला असून, त्यामध्ये वरिष्ठांनकडून गळचेपी होत असल्याने निषेध म्हणून राजीनामे देत असल्याचे नमूद केले आहे.
          या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड.सुमित सावंत,जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलगार,माजी तालुका अध्यक्ष अभिजित जगताप,मा.तालुका उपाध्यक्ष समाधान साबळे,अक्षय देठे,लिंगेश्वर सातपुते,सागर सरतापे,विकास दळवी,मनोज जगताप,सुहास गायकवाड,शुभम वाघमारे, सुनील कांबळे,आदर्श गायकवाड,अजय कांबळे,जय खरे,कुंडलिक कांबळे,रामजी लोंढे आदि सह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages