Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत पिंपरी दुमाला यांच्या वतीने बोनस व मिठाई देत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

 ग्रामपंचायत पिंपरी दुमाला यांच्या वतीने बोनस व मिठाई देत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड


पिंपरी दुमाला (कटूसत्य वृत्त):- दिवाळी सणाच्या तोंडावर ग्रामपंचायत पिंपरी दुमाला यांच्या कर्मचा-यांसाठी गोड बातमी आली आहे ग्रामपंचायत पिंपरी दुमाला यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चेक द्वारे रक्कम व मिठाई देत कर्मचाऱ्यांचे दिवाळी गोडकरण्याचा प्रयत्न केला आहे कर्मचा-यांना गावात दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, ग्रामपंचायत परिसरात स्वच्छतेची कामे करणे, कराची वसूली करणे, लिपीकांची कामे करणे, विविध योजनांची माहिती गावात नागरीकांना देणे, जनजागृती आदी कामे नित्य नियमाने करावी लागतात. या पुढील काळात ग्रामपंचायत पिंपरी दुमाला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन तसेच आरोग्याच्या दृष्टीने विमा कवच आदी सुधारणांवरती भर देऊन जीवनावश्यक संपूर्ण वस्तूंचा मानस पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments