Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या अक्कलकोट रोड,सूत हिरेमठ परिवारातर्फे दहा दिवस डॉ.गुरुस्वामी कलकेरी महाराजांची श्री धानम्मादेवी पुराण कथा उदघाटनास न्यायाधीश सुप्रिया बिराजदार येणार

 सोलापूरच्या अक्कलकोट रोड,सूत हिरेमठ परिवारातर्फे दहा दिवस डॉ.गुरुस्वामी कलकेरी महाराजांची श्री धानम्मादेवी पुराण कथा उदघाटनास न्यायाधीश  सुप्रिया बिराजदार येणार



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या अक्कलकोट रोड,सूत मिल कंपाउंडमधील  हेरिटेज मनिधारी एमपायर सोसायटीत दानशूर उद्योजक व शेतकरी विश्वनाथजी  हिरेमठ-स्वामी यांनी सत्यम-शिवम-सुंदरम हे तीन बंगले स्वतंत्र बांधले आहेत,त्याची वास्तुशांती दि.11 नोव्हेंबर रोजी होणार आहे,त्यानिमित्त दि.1 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान सायंकाळी 7 ते 9  गुड्डापूर धानम्मादेवी पुराण- कथा कन्नड भाषेत आयोजित करण्यात आली आहे.त्याचे उदघाटन दि.1 रोजी संभाजीनगरचे न्यायाधीश सुप्रिया बिराजदार यांच्या हस्ते होणार आहे.विशेष म्हणजे न्यायाधीश सुप्रिया हे सौ.मीनाक्षीताई व काशिनाथजी बिराजदार यांची सुकन्या आहेत.या कार्यक्रमात दररोजची प्रस्तावना प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार करणार आहेत.गदग येथील डॉ.राजगुरु गुरुस्वामी कलकेरी महाराज यांच्या रसाळवाणीत ही कथा ऐकण्याचा लाभ सर्वाना मिळणार आहे.या संगीतमय कथेस गायक बेंगलोर येथील नागलींगय्या वस्त्रदमठ   यांचे सुमधूर गायन होणार आहे. बसवराज होनिगनूर हे तबल्यावर साथ देणार आहेत.या पुराण-कथेस सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन विश्वनाथजी हिरेमठ परिवाराने केले आहे

Reactions

Post a Comment

0 Comments