ह भ प संदीप शिवाजी सोनवणे करणार छत्रपती शासन या पक्षाकडून शिरूर आंबेगाव साठी उमेदवारी अर्ज दाखल
शिरूर (कटूसत्य वृत्त):- पिंपरी दुमाला येथील ह भ प संदीप शिवाजी सोनवणे हे सोमवारी 196 शिरूर आंबेगाव विधान मतदारसंघासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार असून ते छत्रपती शासन या पक्षाच्या एबी फॉर्म वरती निवडणूक लढणार असून त्यांना पक्षाचे प्रांत अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी एबी फॉर्म सुपूर्द केला असून सोनवणे हे सर्व पदाधिकारी यांस समवेत निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरले आहेत ह भ प संदीप शिवाजी सोनवणे पिंपरी दुमाला मध्ये गावगाडा हाकत असताना गेले अनेक वर्ष तंटामुक्ती पदासह पत्नी उपसरपंच पद भूषवले आहे ह भ प संदीप शिवाजी सोनवणे यांची वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क आहे
महाराष्ट्रामध्ये सध्याला विधानसभेचा धुराळ उडालेला असून नामांकन भरण्या साठी सध्या सर्वत्र उमेदवारांचे धावपळ दिसून येत आहे यामध्ये यावर्षी नव्याने रुजू झालेल्या छत्रपती शासन या पक्षाच्या वतीने 196 आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारीसाठी वारकरी संप्रदाया मधील हरिभक्त पारायण संदीप महाराज शिवाजी सोनवणे येत्या सोमवारी 28 10 2024 रोजी आपला नामांकन अर्ज भरणार असून नुकताच छत्रपती शासन या पक्षाचे प्रांत अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी संदीप सोनवणे यांना एबी फॉर्म सुपर द केला असून याच मतदारसंघाचे नेतृत्व अनेक वर्षे मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील हे करत असून या मतदारसंघांमध्ये वारकरी संप्रदायामधील हरिभक्त पारायण संदीप महाराज शिवाजी सोनवणे यांनी नामांकन अर्ज भरल्याचे ठरवल्यामुळे या मतदारसंघांमध्ये लढत ही प्रामुख्याने घड्याळ विरुद्ध तुतारी होती परंतु विविध पक्षांच्या उमेदवारामुळे या मतदारसंघांमध्ये निकाल हा चुरशीचे लागणार असून संदीप सोनवणे हे निर्व्यसनी व चारित्र्यवान उमेदवारा असल्यामुळे तसेच या मतदारसंघांमध्ये व महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने कोणीतरी विधानसभा लढवावी असे मत नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले असतानाच पिंपरी दुमाला येथील सोनवणे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघ चर्चेत आला आहे
0 Comments