२० वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर जाधव हे सेवानिवृत्त झाले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

२० वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर जाधव हे सेवानिवृत्त झाले

२० वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर जाधव हे सेवानिवृत्त झाले 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-२० वर्ष सीमा सुरक्षा बल येथे आपली प्रामाणिकपणे देशसेवा बजावल्यानंतर मेजर राहुल राजेंद्र जाधव हे सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त  मु.पो. गलंदवाडी ( तालुका-मोहोळ) येथील नागरिकांनी मेजर जाधव यांचा भव्य नागरी सत्कार केला.२००४ साली सैन्यात भरती झालेले मेजर जाधव यांनी आजवर जम्मू काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल , ओडिसा , त्रिपुरा , गुजरात अशा दुर्गम ठिकाणी आपली देश सेवा इमाने इतबारे बजावली.सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला. मेजर जाधव यांचे वडील राजेंद्र जाधव व आई  यांना नेहमी वाटायचे कि आपल्या मुलाने देशसेवेत कार्यरत होऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे , त्यांच्या विश्वासाला सत्यात उतरवीत त्यांचा मुलगा राहुल हा पहिल्याच प्रयत्नात देश सेवेत रुजू झाला. मेजर राहुल जाधव यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे केम येथे झाले. आपल्या गावासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याने मेजर जाधव यांची ग्रामस्थांनी मोटरसायकल वरून रॅली काढत त्यांच्या कर्तव्याला सलाम केला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्यराणा पाटील, मेजर चंद्रकांत राऊत , मेजर सोमनाथ भिलार ,तात्यासाहेब मासाळ,पो.पा. अनिल माने, आबासाहेब माने, दादा माने, सिद्धेश्वर मेटकरी, अण्णा सुळे, रामेश्वर शिंगाडे, अतुल शिंदे सो., मनोज मस्के, तात्या गोफणे,रंगनाथ माने, ज्ञानेश्वर माने,अक्षय थिटे,पो.पा.विठ्ठल थिटे,बंटी पाटील  यांच्यासह समस्त  गलंदवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर क्षिरसागर यांनी केले तर आभार हे उमाकांत जाधव यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages