विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचा २४ व्या गळीत हंगामाचा अग्नी प्रदिपन समारंभ

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- गंगामाई नगर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचा सन २०२४-२५ या २४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांच्या शुभ हस्ते बुधवारी करण्यात आला.
यावेळी बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,सन २०२३-२४ या २३ व्या गळीत हंगामात सर्व अडचणीवर मात करीत कारखाना एक नंबरवर आणण्याचा प्रयत्न केला आहे.आगामी हंगामात दोन्ही युनिटचे मिळून २६ लाख मे.टन गळीताचे उद्दिष्ट आहे. बँका आमच्याकडे कर्ज घ्या म्हणून मागे लागतात.अधिकारी वर्गच सर्व व्यवहार बघतात.हे कारखान्याने जपलेले क्रेडिट होय.ते म्हणाले की,२३ वर्षात काशियात्रा,तुळजाभवानी यात्रा,वृद्धांना काशी यात्रा,डोळ्यांची शिबिरे,आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम हे कुठली ही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता चालू ठेवले आहेत.कुठल्यातरी रूपाने लोकांना मदत व्हावी हेच पाहिले गेले.आता तिरुपती बालाजी यात्रा सुरू करण्याचे नियोजन आहे.
प्रतिटन २९५० रु.भाव दिला आहे.ऊस तोडणी मजूर टोळ्यांचे एक बाजूचे भाडे ही देण्याचा निर्णय विचाराधीन आहे.यंदा ऊस भरपूर आहे.चांगला दर व सेवा देतो म्हणून सर्वांना येथेच ऊस द्यावा असे वाटते.या हंगामात शेतकऱ्यांनी गडबड करू नये थोडे थांबावे.ऊस इतरत्र देऊ नये अशी विनंती आ.शिंदे यांनी यावेळी केली.ते म्हणाले माझा माळेगाव,सोमेश्वर पेक्षा जास्त दर देण्याचा मानस आहे.भविष्यात व्याजाचा भुर्दंड कमी होईल.सतत कारखाना वाढत असल्याने खर्च करावा लागतो.साखर क्वालिटी सुधारण्यावर भर राहणार आहे.सर्वांच्या चांगल्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी झाला आहे.
तत्पूर्वी संचालक सचिन देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनाली यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.सुरेश पाठक यांनी पौरोहित्य केले तर सुरेश बागल यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास व्हा.चेअरमन वामनराव उबाळे,संजय पाटील-भिमानगरकर,तुकाराम ढवळे,शिवाजी पाटील,सभापती विक्रमसिंह शिंदे,सुहास पाटील-जामगावकर,रमेश येवले-पाटील,लक्ष्मण खूपसे,पोपट गायकवाड,शिवाजी डोके,वेताळा जाधव,अशोक मिस्किन,भरत चंदनकर,पांडुरंग घाडगे,प्रताप नलवडे,संतोष अनभुले,धनाजी जवळगे,दीपक पाटील,लाला मोरे,संभाजी पाटील, अमोल देवकर,नागेश खटके,मारुती मस्तुद,कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे,केन मॅनेजर एस.पी.थिटे, कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख,ऊस उत्पादक शेतकरी,सभासद कामगार वर्ग आदीजन उपस्थित होते.
0 Comments