Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

 दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद



तालुक्यातील मद्रे गावातील ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

महादेव कोगनुरे यांना दक्षिण मधून निवडून आणणारच

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर मतदारसंघात एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांचा सध्या गावभेट दौरा सुरु आहे.आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावात नवरात्र महोत्सवानिमित्त देवीच्या पुजेचे निमंत्रण मिळाल्याने महादेव कोगनुरे हे देवी पुजेसाठी आज मद्रे गावात आले होते.यावेळी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना एकमुखी समर्थन देण्याचा निर्णय घेतला.सर्वांनी गटतट विसरुन एकत्रित येत महादेव कोगनुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर मतदार संघातून निवडून आणून आमदार करणारच असा पक्का निर्धार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच श्रीशैल व्हनमाने , सोमनिंग गडदे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी मिळून महादेव कोगनुरे यांना दक्षिण मधून ताकद देण्याचा निर्धार केला.
गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढताना दिसतात.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुठल्याही सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रम असला की महादेव कोगनुरे यांची उपस्थिती पहायला मिळत आहे.नेहमीच महादेव कोगनुरे हे सर्व सामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभाग होत असतात.यामुळेच महादेव कोगनुरे यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments