माजी महापौर तथा शहर उपाध्यक्ष शोभा बनशेट्टी यांनी दिला
भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
प्रति
चंद्रशेखर बावनकुळे साहेब
प्रदेश अध्यक्ष,भाजपा
विषय - राजीनामा स्वीकारणे बाबत
अर्जदार - शोभा बनशेट्टी
माजी महापौर तथा शहर उपाध्यक्ष भाजपा
महोदय मी गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे ,या कालावधीत मला पक्षाकडून जी जबाबदारी सोपविण्यात आली त्या प्रत्येक जबाबदारीचे मी प्रामाणिकपणाने निर्वाहन केले आहे या प्रवासामध्ये पक्षाने माझ्यावर अनेक वेळेला विश्वासाने अनेक जबाबदारी दिलेले होते त्याबद्दल मी पक्षाचे मनस्वी आभार मानते माझ्या महापौर पदाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिशय खालच्या पातळीवर जात मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक प्रकाराने त्रास देण्याचा मानहानी करण्याचा अडचणीत आणण्याचा आणि विष प्रयोगासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केलेला आहे यासंदर्भात पक्ष नेतृत्वाकडे वारंवार तक्रार करून देखील त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही याचे मला अतिशय वाईट वाटते तरीही पक्षाची एक प्रामाणिक कार्यकर्ती म्हणून मी पक्ष सोबत दिलेल्या जबाबदारीचे निर्वाहन करत प्रामाणिकपणे राहत आले आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी व्यक्ती कार्यकर्त्यांच्या घरादारांना उध्वस्त करते स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी इतर कार्यकर्त्यांना संपवण्याचे कटकारस्थान करते अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नये यासाठी आम्ही सगळेजण संघटित पणाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता विजय देशमुख यांच्या ऐवजी अन्य कोणालाही उमेदवारी दिल्यास आम्ही प्रामाणिकपणाने काम करून पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचे अभिवचन पक्षाला दिले होते परंतु कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता पुन्हा एकदा हुकूमशाही प्रवृत्तीच्या आमदार विजय देशमुख यांची उमेदवारी लादण्याचा प्रयत्न पश्चनेतृत्वाकडून केला आहे ही बाब मी आणि माझ्यासोबत चे कार्यकर्ते सहन करू शकत नाही आणि पक्षात राहून पाचच्या उमेदवाराच्या विरोधात काम देखील करू शकत नाही त्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या विरोधामध्ये मी बंडखोर भाजपा कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे तरी कृपया माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकार व्हावा ही विनंती मागील अनेक वर्षाच्या कालावधीत पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी मला जे मोलाचे सहकार्य केले आणि पाठबळ दिले त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेतृत्वाचे मनस्वी आभार मानते आणि अतिशय दुःखद अंतःकरणाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्याग करीत आहे कृपया माझ्या राजीनाम्याचा स्वीकार व्हावा ही विनंती
0 Comments