Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्या निकेतन प्रशालेत माजी विद्यार्थ्यांची 24 वर्षांनी पुन्हा भरली शाळा.

 विद्या निकेतन प्रशालेत

 माजी विद्यार्थ्यांची 24 वर्षांनी पुन्हा भरली शाळा.

मसले चौधरी(कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशालेत एस.एस. सी.  बॅच -2001-2 002 या माजी विद्यार्थ्यांची 24 वर्षांनी "माजी विद्यार्थी स्नेहमेळावा "निमित्त पुन्हा भरली शाळा . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक मा. राजेंद्र जाधव सर हे उपस्थित होते.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विजयकुमार दळवे व सुवेल मगर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. माननीय मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते सरस्वती माता  व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

     यावेळी प्रशालेत उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने होऊन, मयत शिक्षक  व विद्यार्थी यांना आदरांजली वाहिली.

      सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते  येथोचित सत्कार करून  सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची शाळा भरली. विद्यार्थी अवस्थेत असलेल्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. वर्गात केलेली मौज -मज्जा, खोड्या, आनंदाचे व दुःखाचे क्षण पुन्हा एकदा जाग्या झाल्या.

     सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यां व विद्यार्थिनींची  ओळख करून घेऊन सध्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याची माहिती करून घेतली.सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत असल्याने शिक्षकांचे डोळे आनंदाने भारावले.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप सिरसट,  बालाजी सिरसट, रामचंद्र लंबे  श्रीकांत भोसले सौ. सुषमा साठे सौ. तनुजा सिरसट व सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. यावेळी प्रशालेतील   शिक्षक रावसाहेब पाटील नागनाथ धुमाळ  परमेश्वर सिरसट   शिवानंद बोधले,  रविकांत साबळे गजानन पाटील  शहाजी आतकरे सौ. कांचन पवार सौ. अंजना पोटरे सेवक संतोष वाघमोडे  गोविंद जांभळे व सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील शिक्षक  शिवानंद बोधले यांनी केले. सूत्रसंचालन  प्रदीप सिरसट यांनी केले. तर आभार बालाजी सिरसट यांनी मानले.अत्यंत भावुक होऊन सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा व शिक्षकांचा निरोप घेतला.

Reactions

Post a Comment

0 Comments