Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदेसेना जिल्ह्यात भाजपचा करणार सुपडासाफ...!

 शिंदेसेना जिल्ह्यात भाजपचा करणार सुपडासाफ...!

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भाजपाला धडा शिकवण्यासाठी आणि शहर जिल्ह्यातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गटाचे) अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्ह्यात भाजप ज्या ठिकाणी उमेदवार उभा करेल त्या ठिकाणी शिंदेसेनाचा उमेदवार उभा करून निवडून आणणार. नाही तर भाजपचा सुपडासाफ करणार असल्याची सिंहगर्जना शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

 निवडणुकीचं वातावरण चांगलच तापू लागलेलं आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. राज्यभरात अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रत्येक उमेदवाराकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. 

त्यातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात भाजपाने आयात केलेल्या उमेदवार लादल्याने एकनाथ शिंदे गटातील पदाधिकारी नाराज झाले असून सोलापूर शहरात भाजपाच्या विरोधात बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शहर मध्ये शहर उत्तर शहर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ लढवण्याची घोषणा केली आहे.

 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शहर प्रमुख मनोज शेजवाल, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेश गायकवाड आणि अण्णासाहेब सत्तू अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संपवण्याचा डाव भाजपाने आखला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकहि जागा शिंदे गटाला सोडली गेली नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील शिवसेना शिंदे गट वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची अमोल शिंदे यांनी सांगितले. तसेच शहर मध्य मधील भाजपाच्या काही नेत्यांनी विधानसभा उमेदवाराची घोषणा केलेला उमेदवार हा परका आहे. स्वयंघोषित भाजपाचा उमेदवार देवेंद्र कोठे यांनी भाजपच्या नेते मंडळींवर यापूर्वी अनेक आरोप केले आहेत. अशा आयात उमेदवाराला आमचा शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही घोषणा केलेल्या सर्व जागा लढवणार हा आमच्या शिवसेनेचा निर्णय आहे. भाजपाला धडा शिकवण्यासाठी आणि शहर जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे की शिंदे यांनी सांगितले  यावेळी पत्रकार परिषदेत अमोल शिंदे, हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, सागर शितोळे, ब्रह्मदेव गायकवाड यांच्यासह महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सध्या राज्यात भाजपाला सहजासहज निवडून येईल असा एकही मतदारसंघा दिसून येत नाही. तरीही भाजपचे नेते सोबत आलेल्या पक्षासोबत कुरघोड्या करत आहे. मात्र इतर पक्षासारखं शिंदेसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा शिंदेसेनेच्या एका नेत्याने दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments