Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मयुर अजिनाथ काळे यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मयुर अजिनाथ काळे यांचा 

प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश


टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-  प्रहारचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांच्या नेतृत्वात माढा तालुक्याचे युवक नेते मयुर काळे यांनी पुणे येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला गेल्या पंचवीस वर्षापासून बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रात जनसेवेसाठी उभारलेल्या संघर्षाला घराघरापर्यंत पोहोचवत कष्टकरी, शेतकरी, मजूर, दिव्यांग, विधवा यांच्या न्याय हक्कासाठी जो लढा उभा केला त्या लढ्यात मयुरजी काळे यांनी बच्चू कडू यांची साथ देण्याचा शब्द यावेळी दिला.

माढा तालुक्यात मयुर काळे यांनी गेल्या सात-आठ वर्षात विविध महत्त्वाच्या विषयावर आंदोलने केली त्यामुळे प्रशासनात बदल घडवून त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, कोणताही राजकीय वारसा नसताना टेंभुर्णी ग्रामपंचायतची निवडणूक देखील त्यांनी अतिशय ज्वलंत मुद्दे घेऊन प्रामाणिकपणे लढवली. माढा तालुक्यात सामाजिक चळवळीतून काम करत असताना राष्ट्रवादी पक्षात युवक अध्यक्ष ते उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हा अध्यक्ष पदावर काम करून तरूणांमध्ये सामाजिक परिवर्तनासोबत स्वाभिमानी व स्वावलंबी विश्वास निर्माण केला आहे. मीरा फाऊंडेशन या त्यांच्या सामाजिक संस्थेद्वारे मयुर फिटनेस द्वारे विद्यार्थ्यांना मोफत व्यायाम प्रशिक्षण, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबवून शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण तसेच अनेक गोरगरीब, गरजू विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, शेतमजूर व तरूणाना उद्योग उभारण्यासाठी त्यांनी प्रामाणिक मदत केली आहे. रायरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी एकत्र केले आहेत.

या वेळी  जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी, उद्योग व्यापार आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष महावीर धोका, नगरचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंह परदेशी, गौरव जाधव, अमोल मस्के या वेळी उपस्थित होते  .

Reactions

Post a Comment

0 Comments