Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपने तिकीट नाकारल्यामुळे आमदार रडला

 

भाजपने तिकीट नाकारल्यामुळे आमदार रडला 

 


वाशिम (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वाशिम विधानसभेचे सलग तीन टर्म आणि 4 टर्म विजयी झालेले आमदार लखन मलिक यांना भाजपने तिकीट नाकारलं आहे.

'मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही, पक्षासाठी प्रामाणिक काम केलं, माझ्यावर अन्याय का केला' असं म्हणत आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले.


भाजपने आतापर्यंत 121 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. यामध्ये बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. अशातच वाशिम मतदारसंघातून 4 वेळा आमदार राहिलेले लखन मलिक यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे लखन मलिक यांना धक्का बसला.

'या मतदारसंघामधून 4 वेळा आमदार झालो. त्यामुळे मला यावेळी तिकीट देतील असा विश्वास होता. पण तिकीट दिलं नाही. पक्षानं असं का केलं, हे मला कळलं नाही. आम्ही अजून कोणताही निर्णय घेतला नाही. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करू, असं म्हणत असताना मलिक यांना अश्रू अनावर झाले.

'आता मला तिकीट का दिलं नाही, हे आमच्या नेत्यालाच माहिती असेल. ज्या नेत्यांना आम्ही सांगितलं. त्यातील काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतला आहे. आम्ही प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं आहे. संधी मिळेल अशी आशा होती. पण उद्या मी सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल' असंही मलिक म्हणाले.

'मी बंडखोरी करणार की नाही हे अजून काही ठरलं नाही. मला मतदारसंघातील लोक आणि कार्यकर्ते जे सांगितली तसं मी काम करेल. आता आमच्यावर अन्याय झाला आहे. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. पक्षाची बदनामी केली नाही, त्यामुळे पक्षाने थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. मी वरिष्ठ नेता आहे, त्यामुळे मला तिकीट द्यायला पाहिजे होतं' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
Reactions

Post a Comment

0 Comments