Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते पोलिसांचे नागरिकांना आवाहन चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी परिसरात नागरिकांची दक्षता महत्त्वाची

नातेपुते पोलिसांचे नागरिकांना आवाहन चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी परिसरात नागरिकांची दक्षता महत्त्वाची 


नातेपुते (कटूसत्य वृत्त)

चोऱ्या, दरोडे रोखण्याचे काम

पोलिसांचे असले, तरी एक सुजाण नागरिक म्हणून परिसरातील चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांची दक्षता महत्वाची आहे.नातेपुते व परिसरातील नागरिक व तरुणांना चोऱ्या , दरोडा पडण्याआधी कोणती काळजी घ्यावी. काय उपाययोजना कराव्यात. याचे मार्गदर्शन पोलिसांकडून देऊन तरुणांना ग्रामसुरक्षा दलात सहभागी होण्याचे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे. तसेच दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक नागरिक घराला लॉक लावून कुटुंबासह परगावी फिरावयास जातात मात्र परगावी जात असताना आपल्या घरातील  सोन्या चांदीचे - दागिने, पैसा व मौल्यवान वस्तू घरातील कपाटात तसेच ठेवून जातात या संधीचा फायदा घेऊन घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू चोर चोरी करून घेऊन जातात. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होत आहे चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना सोन्या चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. दिवाळी दरम्यान नातेपुते पोलीस ठाण्याकडून रात्रीच्या वेळी पोलीस वाहन घेऊन पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. परंतु एकाच वेळी  प्रत्येक वस्ती व वाडी ठिकाणी हे वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून काही संशयास्पद वाटल्यास आपत्कालीन नंबर ११२ यावरती तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती देऊ शकता. असे आवाहन नागरिकांना नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments