ब्ल्यू इंडिया पार्टी महाराष्ट्रात 40 जागा लढविणार
सोलापुरातील 6 मतदारसंघाचे उमेदवार केले जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-तेलंगणा येथील ब्ल्यू इंडिया पार्टी महाराष्ट्र विधानसभेच्या 40 जागा लढविणार आहे. सोलापुरातील सहा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बोंगु प्रसाद गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तेलंगणा येथे या पक्षाची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक हा पक्ष लढविणार आहे. लोककल्याण हा उद्देश ठेवून हा पक्ष महाराष्ट्राच्या रण मैदानात उतरला आहे. सोलापुरात या पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. टप्प्या टप्प्याने उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत. दि. 24 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्यात येणार आहे. यामध्ये अक्कलकोट मतदार संघात चंद्रकांत व्हनकडे, शहर मध्य - योगेश वाघमारे, दक्षिण सोलापूर - दत्तात्रय बंडगर, सोलापूर शहर उत्तर - दत्ता थोरात, मोहोळ - नंदू क्षीरसागर, पंढरपूर मंगळवेढा - देवेंद्र लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असेही राष्ट्रीय अध्यक्ष बोंगु प्रसाद गौड यांनी जाहीर केले.
या पत्रकार परिषदेस भुपल कम्मिटा, एस. सेंथिल कुमार, मधू भुमपल्ली, बोनोथू लिंगण्णा, अमिनोद्दिन शेख, दत्ता थोरात, देवेंद्र लोंढे, योगेश वाघमारे आदी उपस्थित होते.
.jpg)
 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments