Hot Posts

6/recent/ticker-posts

गांधी विद्यालय चिखली 17 वर्ष वयोगट मुलींच्या खो-खो संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड .

 गांधी विद्यालय चिखली 17 वर्ष वयोगट मुलींच्या खो-खो संघाची  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड . 

   सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  गांधी विद्यालयाच्या 17 वर्षे वयोगट मुलीच्या संघाने नांदेड मनपा खो-खो संघावर मात करीत अंतिम फेरीत लातूरच्या ग्रामीण खो-खो संघावर डावाच्या फरकाने विजय संपादन करीत लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गांधी विद्यालय चिखली खो-खो संघाची निवड झाली. या खो- खो संघामध्ये कॅप्टन संतोषी शिंदे, शिवकन्या जाधव, भक्ती सावंत, सृष्टी चव्हाण ,श्रेया सावंत ,समीक्षा जाधव ,वैष्णवी जाधव ,अस्मिता ढवळे, प्रिया हातागळे, साक्षी गंगावणे ,वैभवी मते, दिव्या काकडे ,सई मते, साक्षी सुरवसे, प्रणिती पाटील हे खेळाडू होते.  विजयी  संघाला पवन वाटवडे व दिलीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खो-खो संघाचे संस्थेचे अध्यक्ष  जलराज शाहूराज चोबे  मुख्याध्यापक  बाळासाहेब जाधव, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments