जरांगे-पाटील पॅटर्नचे सोलापुरात 11 उमेदवार; बार्शीतून राजा माने, तर माढ्यातून श्रीमंत कोकाटेंचं नाव चर्चेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

जरांगे-पाटील पॅटर्नचे सोलापुरात 11 उमेदवार; बार्शीतून राजा माने, तर माढ्यातून श्रीमंत कोकाटेंचं नाव चर्चेत

 जरांगे-पाटील पॅटर्नचे सोलापुरात 11 उमेदवार; बार्शीतून राजा माने, तर माढ्यातून श्रीमंत कोकाटेंचं नाव चर्चेत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षण लढ्यातून पुढे आलेल्या जरांगे-पाटील पॅटर्न राज्यात चांगलाचा गाजू लागला आहे.

या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील ११ ही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये बार्शी मतदारसंघातून राजा माने तर माढा मतदारसंघातून श्रीमंत कोकाटे यांचे नाव चर्चेत आहे.

शनिवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेत जिल्ह्यातील ३० इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व कार्यअहवाल समन्वयकासमोर सादर केले होते. तर १२० जणांनी यापूर्वीच अंतरवाली सराटी येथे १२० जणांनी अर्ज व कार्यअहवाल दाखल केले होते. या इच्छुक उमेदवारांमध्ये माढा मतदारासंघातून इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व बार्शी मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची नावे आहेत. याशिवाय जिल्ह्यातून मारुती गायकवाड, प्रा. रणजित जगताप, प्रा. दीपक पाटील, बाळासाहेब बागल हे देखील इच्छुक आहेत.

मनोज जरांगे-पाटील यांनी जिथे समाजाची ताकद आहे तिथेच उमदेवार द्यावेत, असे सांगितले आहे. दुसरीकडे जिथे एस.सी. एस.टी. यांचे आरक्षण आहे तिथे शक्यतो उमेदवार देऊ नयेत. आरक्षण चळवळीला धक्का लागेल असा एकही उमेदवार देऊ नये, असे सांगितले आहे. जे उमेदवार मराठा आरक्षण लढ्याच्या बाजुने आहेत व पुढे मराठा आराक्षण चळवळीसाठी पाठिंबा देणार आहेत. त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने आपली ताकद उभी करावी. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या स्टँपवर तसे लिहून घ्यावे, असा आदेश मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.


चौकट -

मराठा आरक्षण लढ्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीवर अगदी सुरवातीपासून आहे. यातून माझे नाव पुढे आले असेल. निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही. पुढील समीकरणे पाहून उमेदवारीबद्दल निर्णय घेतला जाईल.

- राजा माने, ज्येष्ठ पत्रकार


चौकट -

चांगल्या माणसांनी राजकारणापासून दूर राहिल्याने बदमाशांचे राज्य येते, असे तत्ववेत्ता प्लटो यांनी सांगितले आहे. संसदीय लोकशाहीतून तयार झालेल्या नव सरंमजदारांनी कायम सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे शोषण केले आहे. महायुती गेली की महाविकास आघाडी येते. यामुळे सर्वसमान्यांचा कळवळा असणारी माणसे विधीमंडळात जाणे आवश्यक आहे.

- श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages