सोलापूर शहर मध्य एमआयएमचे फारूक शाब्दी उमेदवार; ओवेसी यांनी केली घोषणा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे अधिकृत उमेदवार म्हणून फारूक मकबूल शाब्दी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असद ओवेसी यांनी जाहीर घोषणा केली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत असद ओवेसी यांनी जाहीर केले.फारूक शाब्दी हे मागील पाच वर्षांपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात एमआयएमचे कार्य करत आहेत.2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकित फारूक शाब्दी यांचा निसटता पराभव झाला होता.मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी फारूक शाब्दी व त्यांचे कार्यकर्ते हे पाच वर्षांपासून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करत आहेत.प्रणिती शिंदें या खासदार झाल्या नंतर फारूक शाब्दी यांचा विजय निश्चित आहे असेही म्हटले जात आहे.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बलाढ्य उमेदवार म्हणून एमआयएमचे फारूक शाब्दी यांच्याकडे पाहिले जाते.
0 Comments