मुली व महिलांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी - पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर
माढा (कटूसत्य वृत्त):- नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक ता.माढा येथे अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत मुली,महिला यांची सुरक्षा व आपली जबाबदारी या विषयावर माढा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक (API)नेताजी बंडगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना नेताजी बंडगर यांनी मुली व महिलांच्या सुरक्षे विषयींच्या विविध कायद्यांची माहिती दिली. विद्यालयाच्या फलकावर पोलीस काका,पोलीस दीदी यांचे मोबाईल क्रमांक लावण्याविषयी सांगितले. तक्रार पेटीतील तक्रारींची आठवड्यातून दोन वेळा पाहणी केली जाईल तसेच शाळा भरण्यापूर्वी शाळा सुटल्यानंतर नियमित पेट्रोलिंग करणार असल्याचे सांगितले.विद्यालयातील मुलींशी संवादही साधला.
यावेळी विद्यालयाचे मुख्या.दशरथ देशमुख ,माढा पोलीस स्टेशनचे संजय घोळवे व सचिन काशिद, गणेश गुंड विद्यालयाचे गुरुकुल विभागप्रमुख शब्बीर तांबोळी ,ज्येष्ठ शिक्षिका श्रीम सुनिता बिडवे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते. शब्बीर तांबोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments