Hot Posts

6/recent/ticker-posts

नरखेड मंडलातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी कार्याध्यक्षा -ज्योत्स्ना पाटील

 नरखेड मंडलातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी 

 -ज्योत्स्ना पाटील 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-गेल्यावर्षी खरीप हंगामात नरखेड व अनगर मंडलातील सोयाबीन पिकावर येलो मोझेक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाई व पीक विमा रक्कम मिळवून देण्याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष ज्योत्स्ना पाटील यांनी आ. यशवंत माने यांना निवेदन दिले.

तालुका कृषी खात्याने पाहणी करून सोयाबीन पिकाचे पंचनामेही केले होते. कृषी विभागाने शासनाकडे अहवालही पाठवला. मात्र, एक वर्ष झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यासंदर्भात ज्योत्स्ना पाटील यांनी आ. माने यांची भेट घेऊन मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती केली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची मागणी केली. आ. माने यांनी लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी पाटील यांच्यासमवेत प्रदेश सदस्या लता ढेरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments