Hot Posts

6/recent/ticker-posts

माढेश्वरी अर्बन बँकेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न्;२०० नेत्रशस्रक्रिया -महारक्तदान शिबीर १ सप्टेंबर ला होणार- आमदार बबनराव शिंदेची माहिती

 माढेश्वरी अर्बन बँकेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न्;

२०० नेत्रशस्रक्रिया -महारक्तदान शिबीर १ सप्टेंबर ला होणार

-आमदार बबनराव शिंदेची माहिती 


माढा (कटूसत्य वृत्त) :- केवळ खातेदार सभासदांच्या ठेवी घेणे,कर्जे देणे नफा मिळवणे इतक्या पुरतेच बॅकेचे मर्यादित काम न करता सामाजीक बांधिलकीतून विविध उपक्रमातून बॅक कार्यरत आहे.भविष्य काळात देखील विश्वासाच्या पाठबळावरच ३ कोटीच्या ठेवीचा माढेश्वरी अर्बन बँकेने टप्पा पार केला असुन २०० नेत्र शस्रक्रिया आणी महारक्तदान शिबीर १ सप्टेबरला घेणार असल्याचे बॅकेचे चेअरमन तथा आमदार बबनराव शिंदेनी बोलताना सांगितले. 

एक हजार रुपयांच्या 1 शेअर्स पोटी 3700 रुपये रक्कम लाभांश रुपाने दिली आहे. टेंभुर्णी येथे बँकेची सुसज्ज व अद्ययावत इमारत उभी केली आहे येत्या पंधरा दिवसांत त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र इमारत उभी केली जाणार आहे.माढेश्वरी अर्बन को बँकेच्या २9 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमदार शिंदे माढ्यात   बोलत होते.बॅंकेच्या सभासदांच्या विश्वासामुळे व बॅंक कर्मचाऱ्यांच्या चिकाटीमुळे बॅंकेची वाटचाल प्रगतीपथावर आहे.बॅकेचा एनपी शुन्य टक्का असुन बॅकेच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती चेअरमन आमदार शिंदेनी दिली.प्रारंभी ग्रामदैवत माढेश्वरी व माजी आ.कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वार्षिक सभेच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना बॅंकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत म्हणाले की,2000 साली सुरु केलेल्या माढेश्वरी बॅंकेकडे २२९ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.३५० कोटीची उलाढाल बॅकेची झाली आहे.२ कोटी ७२ लाख नफा झालाय.बॅकेच्या ९ शाखा कार्यरत आहेत.51 कर्मचारी कार्यरत आहेत.२४ वर्ष सलग बॅकेला ऑडीट वर्ग "अ" आहे.राजकारणात आमदार बबनराव शिंदे हे मागील ३० वर्ष आघाडीवर आहेत. त्याच प्रमाणे " अर्थ कारणात "ही आमदार शिंदे यांच्यामुळे क्रांती झालेली आहे.हे नाकारुन चालणार नाही.सोलापूर जिल्हात माढेश्वरी बॅक ही तिन क्रमांकाची आहे.येत्या मार्च मध्ये बॅक २५० कोटीची उलाढाल बॅक करणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन बॅकेच्या माध्यमातुन राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती  लुणावत यांनी दिली.बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी अहवाल वाचन केले.बॅकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत, सभापती विक्रमसिंह शिंदे,सुहास पाटील जामगावकर,डाॅ.निशिंगधा माळी,सुनील रावडे,अजित देशमुख,सिए.विकास वाघे,दिगंबर माळी,अॅड.नाना शेंडे,सुरेश बागल,राजेंद्र पाटील,संजय खराप्रदीप चौगुले,सज्जन जाधव, अमोल चवरे यांचे सह बॅकेचे संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.डि.व्ही.चवरे यांनी सुत्रसंचलन तर गणेश काशिद यांनी आभार मानले
Reactions

Post a Comment

0 Comments