छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी, जे जे नेते जबाबदार असतील.
त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा
- सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सकल हिंदुस्थानचे दैवत छ. शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा पुतळा मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोठ्या थाटामाटात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु सात ते आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आत पुतळा जमीनदोस्त झाला. या घटनेचा तीव्र निषेध सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा करत आहे.
या पुतळा उभारणीचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले होते तो कॉन्ट्रॅक्टर, ज्यांच्या अधिकारक्षेत्रात हे काम चालू होते ते अधिकारी आणि त्यांच्याकडून कमिशन खाणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवर जो पर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सकल मराठा समाज शांत बसणार नाही .
तसेच भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते ह्यांनी लोकसभेला शिवप्रेमींची मते मिळवण्यासाठी अतिशय घाई गडबडीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. वास्तविक पाहता काम मजबूत होण्यासाठी जो विशिष्ट कालावधी देणे आवश्यक होता तो न देता फक्त लोकसभेला भा. ज. पा. ला फायदा मिळावा म्हणून अतिशय घाई गडबडीने उद्घाटन केले त्यामुळं हा पुतळा पडला.
शिवबांचा पुतळा कोसळल्याने राज्याची व देशाची मान शरमेने खाली गेली आहे. आता त्याची कदाचित चौकशी होईल. ठेकेदार काळे यादीत जाईल. एक दोघेजण निलंबित होतील. मात्र झालेली अवहेलना वरून निघणार नाही. कोट्यावधी शिवप्रेमींना झालेल्या यातनांची भरपाई होणार नाही. अशा पद्धतीने आपल्या लाडक्या राजाच्या पुतळा कोसळल्याचे शल्य राहीलच.
त्यामुळं हा पुतळा पडला. जे जे नेते याला जबाबदार असतील. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा समस्त शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवय राहणार नाही. व यामध्ये जर कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पूर्ण पणे सरकार व प्रशासन जबाबदार असेल.....!
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा
0 Comments