Hot Posts

6/recent/ticker-posts

तीर्थक्षेत्र सोमेश्वर महाराजांच्या दर्शनासोबत हिरवा निसर्ग व श्रावण सरींचा आनंद लुटण्यासाठी शाळांच्या सहली ची पावले पिंपरी दुमालाकडे

 तीर्थक्षेत्र सोमेश्वर महाराजांच्या दर्शनासोबत हिरवा निसर्ग व श्रावण सरींचा आनंद लुटण्यासाठी शाळांच्या सहली ची पावले पिंपरी दुमालाकडे


शिरूर (कटूसत्य वृत्त):- शिरूर तालुक्यातील भौगोलिक अस्मितेचे पिंपरी दुमाला गाव व तेथील तीर्थक्षेत्र सोमेश्वर देवस्थान असेल किंवा तेथील निसर्गरम्य वातावरण फळबागा तुडुंब भरलेले ओढे नाले त्यासोबत गावाला कृषी प्रधान म्हणून मिळालेला बहुमान या सर्व बाबींमुळे दिवसेंदिवस खुणवत असलेली पर्यटकांची पावले यामुळे पिंपरी दुमाला गाव एक नवीन आदर्श गाव म्हणून ओळख तयार करून पाहत आहे यातच पिंपरी दुमाला येथे श्रावणी सोमवार निमित्त तीर्थक्षेत्र सोमेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी जमत असलेली अलोट गर्दी व तालुक्यातील अनेक शाळांच्या सहली तेथील देवदर्शनासाठी व पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी जात असून अनेक शाळा मोठ्या प्रमाणावरती सहलीच्या निमित्ताने भेटी देत आहेत

पांडवकालीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या देवभूमी श्री क्षेत्र पिंपरी दुमाला येथील श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त रांजणगाव गणपती पंचक्रोशीतील अनेक शाळांनी पिंपरी दुमाला येथे सहली निमित्त भेटी दिल्या गावाचा संपूर्ण परिसर शेकडो विद्यार्थ्यांमुळे गजबजुन गेला होता. निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे व टुमदार असे पिंपरी दुमाला गाव फळबागांसाठी प्रसिद्ध आहे .यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे येथील डोंगररांगावरील निसर्ग सौंदर्य अधिकच बहरले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात. विशेषतः परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा  श्रावणी सोमवार यात्रेचे निमित्त साधून येथे सहली घेऊन येतात. श्री सोमेश्वर व श्री रामेश्वर मंदिरांमधील शिवलिंगाचे दर्शन करून हे विद्यार्थी संपूर्ण दिवस येथे रमून जातात.
 याप्रसंगी श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गावातील व परिसरातील दानशूर व्यक्ती दर्शनासाठी आलेल्या सर्व विद्यार्थी व भाविकांना अन्नदानाचे आयोजन करतात. 
मंदिर परिसरातील विशाल वटवृक्षाच्या पारंब्यावर झोके घेत व यात्रेतील खेळण्यांचा आनंद लुटत सहलीचा दिवस कधी संपला हे विद्यार्थ्यांच्याही लक्षात आले नाही. विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी उत्तम नियोजन व भोजन व्यवस्था केल्याबद्दल केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे व मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट पिंपरी दुमाला यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी सुनील सोनवणे,शेखर पाटेकर, कैलास पिंगळे,अभिषेक शेळके,श्रीकांत सोनवणे,अरुण कळसकर,कैलास बडदे इ. उपस्थित होते.मनात रेंगाळणाऱ्या सुंदर आठवणी सोबत घेऊन विद्यार्थी आपापल्या गावी रवाना होत असताना त्यांच्या मनामध्ये व चेहऱ्यावरती दिसणारा आनंद पाहून गुरू जणांना समाधान वाटत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments