Hot Posts

6/recent/ticker-posts

खा. निलेश लंकेच्या उपस्थितीत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रति लोकसभा अधिवेशन टाकळी ढोकेश्वरमध्ये २६ वी राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रम

 खा. निलेश लंकेच्या उपस्थितीत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रति लोकसभा अधिवेशन 

टाकळी ढोकेश्वरमध्ये २६ वी राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रम 

पारनेर (कटूसत्य वृत्त) :- शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी टाकळी ढोकेश्वर येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रति लोकसभा अधिवेशन भरले होते.या अधिवेशनात संसदीय कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशाने २६ वी राष्ट्रीय युवा संसद पार पडली सर्व विद्यार्थी केंद्रीय मंत्री मंडळ व विरोधी पक्षनेते सहभागी होत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
   भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारा संचालित नवोदय विद्यालय समितीमार्फत देशभरातील नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी युवा संसद कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ज्ञानाधिष्ठित व मूल्याधिष्ठित समाज निर्मितीत विद्यार्थ्यांना केवळ माहिती मिळवून भागणार नाही तर विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाची आणि कार्यपद्धतीची जाणीव व्हावी. त्यांच्या नेतृत्वगुणाला प्रोत्साहन व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठीच नवोदय विद्यालय समितीद्वारे राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानुसार दिनांक २५ ऑगस्ट रोजी टाकळी ढोकेश्वर येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाद्वारे आयोजित २६ व्या युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार निलेशजी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संसदेचा हा कार्यक्रम पार पडला.यावेळी खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सत्ताधारी आणि विपक्ष पक्षातील अनेक खासदारांना आपापली भूमिका काय याबाबत थेट संवाद साधत त्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीसाठी शुभेच्छा दिल्या. नवोदय विद्यालयाची कोणतीही अडचण असो मला हक्काने सांगावी मी ती सोडवील असे असवस्थ केले. या कार्यक्रमासाठी टाकळी ढोकेश्वर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाचे प्राचार्य एस बी नवले सर यांनी न्यायाधीशाची भूमिका पाडली. 
उपसभापती बापूसाहेब शिर्के प्राचार्य एस.पी. बोरसे अॅड राहुल झावरे बाळासाहेब खिलारी उपसरपंच रामभाऊ तराळ माजी उपसरपंच सुनील चव्हाण दत्तात्रय निवडुंगे उपसरपंच सोनु नवले भाऊसाहेब झावरे बबलू रोहकले अॅड सतीश पावले जयसिंग झावरे अंकुश पायमोडे मळीभाऊ रांधवन मोहन रोकडे विद्यालय पालक शिक्षक समितीचे सदस्य बाळासाहेब रोहकले सागर हांडे उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पडणारे एकूण ५४ विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील मराठी विषय शिक्षक राजाराम फंड व इंग्रजी विषय शिक्षक पांडुरंग पवार सर यांनी केले. युवा संसद कार्यक्रमाचे प्रभारी म्हणून सामाजिक शास्त्र विषय शिक्षक अंकुश फसले व दिलीप खिलारे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य एस पी बोरसे , उपप्राचार्य जी बी मुन्नारवार, कार्यालयीन अधीक्षक जाधव सर या ंचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक प्रयासाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

 नवोदय विद्यालयाच्या प्रति लोकसभेत पंतप्रधान व लोकसभा अध्यक्षही ..
लोकसभा अध्यक्ष - मंगेश थोरात, पंतप्रधान शिवम बटुळे, विरोधी पक्ष नेता आदिती एरंडे, गृहमंत्री- श्लोक पवार, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री संस्कृती गुंजाळ, कृषी आणि खाद्य मंत्री अनामिका राजपूत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री - सौम्म चौधरी, रेल्वेमंत्री- श्रावणी विश्वासराव, खेळ मंत्री नरेश सोळुंके, कौशल्य विकास आणि उद्योग मंत्री - शौर्या नायपल्ली, जलशक्ती संसाधन मंत्री स्वानंदी ठाणगे, संचार मंत्री-वैष्णव देवढ, शिक्षण मंत्री- प्रणव वाघमारे, सामाजिक न्यायमंत्री- समृद्धी भोंडवे, ग्रामीण विकास मंत्री नीतांशू सुतार, अंतरिक्ष विभाग मंत्री- अर्णव कांबळे, स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री आर्यन वर्मा, अवजड उद्योग मंत्री राजवीर कुलांगे, पर्यटन मंत्री- साक्षी निकम, विशेष अधिकाराचे उल्लंघन यश अंत्र, याशिवाय विरोधी पक्षामध्ये प्रश्न विचारण्यासाठी श्रेया कलासने, अथर्व मस्के, अविष्कार कांबळे, वेदांत पांडे, ओंकार पवार, तनुजा गुंजाळ, दीक्षा देवकर, अनुष्का यादव, वैष्णवी केसरी, राजदीप फटांगरे, युवराज सुसे, सार्थक हिंगणे, कार्तिक शिंदे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विदेशी प्रतिनिधी म्हणून अविका वाघमोडे, सिद्धेश सदगीर, यश आल्हाट या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. पत्रकार म्हणून गौरव वाघमारे, उज्चल लगड व स्वप्निल पाटील या विद्यार्थ्यांनी काम केले. सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या भूमिका अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments