Hot Posts

6/recent/ticker-posts

मताच्या लालसापोटी निकृष्ट दर्जाचा पुतळा तेथे उभा केला - पुरुषोत्तम बरडे

 मताच्या लालसापोटी निकृष्ट दर्जाचा पुतळा तेथे उभा केला - पुरुषोत्तम बरडे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राजकोट किल्ला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर किंचितही प्रेम नसणारे, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मताच्या लालसापोटी निकृष्ट दर्जाचा पुतळा तेथे उभा केला. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत छत्रपतींचा आशीर्वाद मोदी सरकार असे म्हणते परंतु पुतना मावशीचा प्रेम दाखवणाऱ्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा पुतळा मजबूत उभा करावा आणि आशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असं म्हणत पुरुषोत्तम बरडे यांनी सरकारवर टीका केली.
यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक राजन जाधव यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करत खरपूस समाचार घेतला.
यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, माऊली पवार, रवी मोहिते, श्रीकांत डांगे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, ज्ञानेश्वर सपाटे, लहू गायकवाड, सुभाष पवार, मतीन बागवान, प्रकाश ननवरे, महादेव गवळी, विजय घुले, आदींसह शिवप्रेमी व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments