गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातून टेंभुर्णीतील तिघांची निर्दोष मुक्तता
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातून टेंभुर्णीतील तिघांची निर्दोष मुक्तता नियमित फौजदारी दावा 366/2018 भादवि कलम 326,323, 504, 506, 34 याप्रमाणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन ला 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी -- अमोल शिवाजी ननवरे रा. टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापुर यांनी आरोपी- 1) बाबुराव अजिनाथ ढगे २) बाळासाहेब अजिनाथ ढगे 3)नवनाथ अजिनाथ ढगे सर्व रा. टेंभुर्णी ता. माढा यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता. यात हकिकत अशी की, दि. 14/03/2018रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिंचा काढण्यास गेल्यावर मागील इलेक्शन चा राग मनात धरून आरोपीनी शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली वगैरेची फिर्याद दाखल होती .यात सदरील प्रकरण गुणदोषावर चालून अंतीम निकाल झाला यात आरोपीचे वकील ॲड. दयानंद नानासाहेब पाटील यांनी साक्षीदारांना उलटतपासणीत विचारलेल्या प्रश्नांत साक्षीदारानी दिलेल्या उत्तरावरून त्यांची साक्ष विश्वासार्ह वाटत नाही .त्यामुळे फिर्यादी पक्षाची केस शाबीत होत नाही. असा युक्तिवाद माढा न्यायालयातील कनिष्ठ स्तर न्यायाधीश मे.जी व्ही .गांधे.यांचे समोर आरोपींचे वकील ॲड.दयानंद नानासाहेब पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
0 Comments