Hot Posts

6/recent/ticker-posts

इंटरनॅशनल एक्सलेंस रेकॉर्ड लाठीकाठी प्रकारात सृष्टी बिळीअंगडी हीचा जागतिक विक्रम.... राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्याकडून विशेष कौतुक

 इंटरनॅशनल एक्सलेंस रेकॉर्ड लाठीकाठी प्रकारात सृष्टी बिळीअंगडी हीचा जागतिक विक्रम....

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्याकडून विशेष कौतुक

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दि.११ रोजी  स्वातंत्र्य सैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान संचलित  रूद्रशक्ति गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र सोलापूर. व पारंपारिक लाठी खेळ संघ महाराष्ट्र संयुक्त विद्यमानाने आयोजित कु .सृष्टी धानप्पा बिळीअंगडी हिने सलग १०तास १० मिनिट १०सेकंद  पारंपारिक फिरवण्याच्या अनोखा विक्रम केला.         सकाळी ८.१५ वा. सुरु  झालेल्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेंस रेकॉर्ड व इंडिया बुक मध्ये होणार आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून तिचे विशेष कौतुक केले जात आहे.सोमवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या शुभहस्ते सृष्टीचा शाल घालून पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी सृष्टीच्या या यशाबद्दल विशेष कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सृष्टीचा आदर्श इतर मुलांनीही घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,माजी नगरसेवक नारायण माशाळकर, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम,युवती अध्यक्ष किरण माशाळकर, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ संदीप माने,कार्याध्यक्ष महेश वसगडेकर,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी , लाठीकाठी प्रशिक्षक विवेक मिस्किन,बसव ब्रिगेड सोलापूर शहर - जिल्हाध्यक्ष अमित रोडगे ,दशरथ शेंडगे - देशमुख ,श्यामराव गांगर्डे , सोशल मीडिया शहर - जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, यांची उपस्थिती होती...

Reactions

Post a Comment

0 Comments