औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आपचे बेमुदत आंदोलन सुरु.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज सकाळी ठीक 11.00 वाजल्यापासून ITI मध्ये होत असलेल्या गैरकारभारासंदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सरळ सेवा मार्फत रुजू असलेले अनेक शिल्पनिदेशकांना प्रात्यक्षिक करता येत नाही. तसेच विध्यार्थांना शिकवता देखील येत नाही. अनेक वर्षांपासून मेकॅनिकल ट्रेड चे अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत. निवड समितीने अनेक तासिका निदेशक असे नियुक्त केले आहेत ज्यांना प्रात्यक्षिक घेता येत नाही. विध्यार्थांना प्रात्यक्षिक करण्याकरिता लागणारे साहित्य साधने तसेच कच्चा माल उपलब्ध नाहीत. विध्यार्थांना प्रवेश देताना वाचनालयाकरिता शैक्षणिक फी मधून १००/- रुपये आकारले जातात मात्र अनेक वर्षांपासून वाचनालय बंद अवस्थेत आहे. अनेक वर्षांपासून शिल्पनिदेशकांचे पद रिक्त आहेत. कौशल्य विकास सहसंचालक यांचे आदेश असताना देखील तेथे जुने तासिका तत्वावरील निदेशकांची नेमकून करण्यात आलेले नाहीत. यासोबत अनेक आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी लावले
0 Comments