वारकरी भाविकांसाठी नव्याने पाच ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूरात येतात. तसेच दिवसेंदिवस पायी पालखीसोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्याही वाढत आहे. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. तसेच त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिंडींच्या मुक्कामासाठी पंढरपूर शहरालगत नवीन पाच ठिकाणी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे.
आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी पंढरपूर रेल्वे मैदान , भटुंबरे, गुरसाळे, गोपाळपूर, वाखरी या ठिकाणी दिंडीच्या मुक्कामासाठी निवारा, पिण्याचे व वापराचे पाणी, शौचालय, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दिंडी चालकांनी व भाविकांनीयाबाबत मौजे भटुंबरे ग्रामसेवक संतोष गायकवाड मो. क्र. 8379004642, मौजे गुरसाळे ग्रामसेवक अरविंद कुंभार मो.क्र. 9881176522, मौजे गोपाळपूर ग्रामसेवक संतोष माळी मो. क्र. 8208793042, ग्रामसेवक रविंद्र शिंदे मो. क्र. 9373940577, मौजे वाखरी ग्रामसेवक सुहास शिंदे तसेच पंढरपूर (रेल्वे मैदान) येथील जागेबाबत पंढरपूर नगरपालिका कर अधिकारी सुप्रिया शिंदे मो. क्र. 9552999954, लिपिक संभाजी देवकर मो. क्र.9921254009 यांच्याशी संपर्क साधावा.
आषाढी यात्रा कालावधीत दिंडी चालक, वारकरी-भाविक यांना पायाभुत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त निवाऱ्यासाठी वारकरी-भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment