श्री.संत ज्ञानेश्वर महाराज, श्री.संत तुकाराम महाराज पालखीचे वाखरी येथे पालख्यांचे खा. प्रणिती शिंदे यांनी केले स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर येथे उभे रिंगण अतिशय उत्साहात पार पाडले. पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेले असंख्य वारकरी ओठांवर विठ्ठलाचे नाव, हातात टाळ-मृदुंग-पताका पायांना लागलेली पंढरीची ओढ हे सगळं पाहूंन मनाला अध्यात्मिक शांती लाभते. "हा सुख सोहळा स्वर्गी नाही" याची पावलोपावली प्रचिती देणारा आहे. आज बाजीराव विहीर वाखरी येथे डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदिपक असा माऊलींचा रिंगण सोहळा... श्रद्धा व शिस्तीचे दर्शन घडवणारा अनुपम सोहळा .. याची डोळा याची नयनी अनुभवण्यासाठी खासदार प्रणितीताई शिंदे या लाखो वारकऱ्यांच्या सोबत आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.
यानंतर खासदार प्रणितीताई शिंदे यांनी वारकरी, व गावकरी यासमवेत पायी चालत वारीचा विलक्षण सोहळा अनुभवला.
यावेळी अमर सूर्यवंशी, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, किरण घाडगे, नितीन शिंदे, पिंटू भोसले, राहुल पाटील, संदीप शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सोबत उपस्थित होते.
0 Comments