मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडण्याचे आवाहन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या, सोलापूर यांचेद्वारे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माता, भगिनी यांना आवाहन करण्यात येते की, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ जिल्हा बँक तळागाळातील शेतकऱ्यांना ०% व्याजदर योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, राजीव गांधी योजना, दुष्काळ निधी इ. प्रकारच्या सेवा देत आहोत. महाराष्ट्र शासनाने नुकतीच घोषित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.
आम्ही जिल्हा बँकेमध्ये २०७ शाखेमध्ये पात्र माता, भगिनीचे खाते तात्काळ उघडण्यासाठी बँक आपले हार्दिक स्वागत करीत आहे. यासाठी बँकेने, महिला अधिकारी व कर्मचारी व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यांची संयुक्त समिती स्थापन केलेली असून, पात्र माता, भगिनींना बचत खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन तालुका निहाय करणार आहेत. सदर बचत खाती प्रभावीपणे उघडण्यासाठी सदर समितीचे सदस्य आपल्या गावामध्ये शिबीर (कॅम्प) आयोजित करुन महिलांना आर्थिक सक्षमतेचे/आत्मनिर्भयतेचे मार्गदर्शन करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व माता, भगिनींना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की, शासनाच्या या योजनेकरीता बँकेच्या या सार्वजनिक उप्रकमास आपण सेव्हिंग खाती उघडून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
.jpg)
No comments:
Post a Comment