पुण्यनगरी आयोजित शिरापूर ( सो ) येथील नेत्र शिबिरामध्ये १७६ रुग्णांची तपासणी.
७१ रुग्णावर होणार शस्त्रक्रिया.
रुग्णांनी आरोग्याबरोबर डोळ्याचीही काळजी घ्यावी - डॉ. शरद जाधव.
सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-रुग्ण आरोग्याची काळजी घेतात, पण डोळ्याची शक्यतो काळजी घेत नाहीत. डोळा हा माणसाचां महत्त्वाचा भाग आहे. डोळ्याने जर कमी दिसायला लागले तर जीवन जगणे मुश्किल होते. स्वावलंबी जीवन परावलंबी होते .त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत असताना डोळ्याचीही निगा राखणे गरजेचे आहे असे मत नेत्रचिकित्सक डॉ. शरद जाधव यांनी व्यक्त केले.
यशवंत कृषी केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वोउपचार रुग्णालयाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील हनुमान मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शिबिरात डॉ. जाधव हे बोलत होते. विठ्ठल रुक्मिणी मातेचे डॉ. श्रीकांत जाधव यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये १७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १०५ रुग्णांवर मोफतऔषध उपचार करण्यात आले तर ७१ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वोउपचार रुग्णालयाच्या वतीने डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. निलेश बागुल ,डॉ. रोहन सोमानी, डॉ शुभम दरेकर, डॉ. रवी चोरगे यांनी रुग्णांची तपासणी केली तर त्याना अभिजीत जाधव, रणधीर महेंद्रकर यांनी मदत केली. कार्यक्रमास पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर, उपसंपादक शरीफ सय्यद, शिरापूर (सो)प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिलानी खान, शिरापूरच्या सरपंच वृषाली सावंत, उपसरपंच सौदागर साठे, बाळासाहेब हारदाडे, सागर काळे, ह.भ. प. अशोक काळे महाराज, औदुंबर मसलकर, विठ्ठल गावडे ,दत्ता साठे ,बापू निकम, आरोग्य सहायिका अनुराधा माडेकर - बारगळ, आरोग्यसेविका सरस्वती ढगारे, शुभांगी गुरव, भाग्यश्री वाघचौरे, कल्याणी कोळी, सत्यभामा कोळी, कल्पना राजेपांढरे, सुरेखा मारडकर, राणी घरबुडे, अमोल आदमने, अमोल सावंत, रविराज चव्हाण, गोरख चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण आधीसह शिरापूर ( सो ) ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच प्रकाश काळे यांनी केले. तर उपस्थितताचे आभार पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांनी मानले
शिरापूर ( सो ) येथील नेत्र शिबिर आयोजित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सरवदे , डॉ विठ्ठल धडके, सुधाकर शितोळे बाळासाहेब हारदाडे आदींचे सहकार्य लाभले.
शिरापूर ( सो ) येथील नेत्र शिबिर आयोजित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सरवदे , डॉ विठ्ठल धडके, सुधाकर शितोळे बाळासाहेब हारदाडे आदींचे सहकार्य लाभले.
शिरापूर ( सो ) येथील नेत्र शिबिर आयोजित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सरवदे , डॉ विठ्ठल धडके, सुधाकर शितोळे बाळासाहेब हारदाडे आदींचे सहकार्य लाभले.
या शिबिराचे आयोजन पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांनी केले होते यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सर्व दे डॉक्टर विठ्ठल धडके, मॅन काईड फार्मा कंपनीचे व्यवस्थापक अविनाश शिराळकर, अक्षर राजेश्वर ,सुधाकर शितोळे, बाळासाहेब हारदाडे आदींचे सहकार्य लाभले


No comments:
Post a Comment