साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

४ ऑगस्टला मिरवणुकीने होणार सांगता, ४५ हुन अधिक मंडळे होणार सहभागी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने जगविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा १०४ वा जयंती महोत्सव दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सोलापूर शहर जिल्हयामध्ये मोठया उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्यावर्षी गत वर्षीच्या तुलनेत ४५ हून अधिक मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. रविवार, दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्नांची भव्य दिव्य जयंतीची मिरवणूक होवून शहराच्या जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती माजी राज्य मंत्री व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष उत्तमप्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील मराठी साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासातील व ज्ञान चळवळीतील सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले नाव म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे. आपल्या साहित्य सेवेद्वारे मराठी साहित्याचा अवकाश जागतिक पातळीवर नेण्याचे आणि मराठी साहित्याची पताका १९५० च्या दशकापासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकविण्याचे महत्तम राष्ट्रीय योगदान देणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंना त्यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे असेही यावेळी खंदारे यांनी आपले मत व्यक्त केले.

. १ ऑगस्ट २०२४ रोजी संपूण शहर, जिल्हयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दि. २ व ३ ऑगस्ट रोजी शहर व जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम होणार आहे.रविवार, दि . ४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयापासून मिरवणूक काढण्यांत येणार आहे . मिरवणुकीने जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.
या मिरवणुकीची सुरुवात रविवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,पोलीस आयुक्त एम.राजकुमार,खा.प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख आदी विविध मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणूकी चे उदघाट्न होऊन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.

 या मिरवणुकीमध्ये गतवर्षी ४५ मंडळे सहभागी झाली होती. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ४५ मंडळे सहभागी होणार आहेत. जवळपास  १० ते १२ कि.मी. पर्यंत लांबीचा परेग या मिरवणुकीमध्ये होता. यंदाच्या वर्षी अधिक मंडळे वाढून भव्य आणि दिव्य अशा नेत्रदिपक मिरवणूक आकर्षक सजावटीने विविध उपक्रमाने सामाजिक संदेश देणारे देखावे अशा माध्यमातून ही मिरवणूक होणार आहे.

या मिरवणुकीसाठी सोलापूर शहर जिल्हयातील तमाम साहित्यरत्न समिती समन्वयक अण्णाभाऊ साठे प्रेमीनी विशेषत: मातंग समाजातील सर्व समाजबांधव, माता-भगिनी यांनी मोठया प्रमाणात मिरवणूकीमध्ये सहभागी होवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारचं व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे आणि समाजाच्या ताकतीचे शक्ती प्रदर्शन करावे, असे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवती जयंती समितीचे अध्यक्ष खंडू बनसोडे यांनी केले आहे.

 या पत्रकार परिषदेला मध्यवर्तीचे सचिव विशाल लोंढे, मिरवणूक प्रमुख सुरेश पाटोळे,  साक्षांत लोखंडे, विवेक डोलारे,आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages