राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे मुख्यमंञी माझी लाडकी बहिण योजनाबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन : - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 8, 2024

राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे मुख्यमंञी माझी लाडकी बहिण योजनाबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन :

 राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे मुख्यमंञी माझी लाडकी

 बहिण योजनाबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन :


रावगाव (कटूसत् वृत्त):-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वपूर्ण योजना असून शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत दुर्गम भागापर्यंत जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी काही जाचक अटी कमी करून सुटसुटीत पणा आणलेला आहे असे मत   देवेंद्र फडणवीस सोशल मीडिया टीमचे गणेश कराड यांनी मोजे रावगाव येथील महिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे करण्यात आले होते यावेळी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, वाचनालयाचे भास्कर पवार आदी मान्यवर उपस्थित होते .

पुढे बोलताना ते म्हणाले की महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करून यासाठी नोंदणी सुरू केलेली आहे तसेच नारि शक्ती ॲपद्वारे आतापर्यंत बहुतांश महिलांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे ॲप किंवा महा-ई-सेवा द्वारे महिलांनी आपल्या सर्व कागदपत्रासही ऑनलाइन नोंदणी करावी. सर्वप्रथम कागदपत्रांमध्ये तांत्रिक  काही त्रुटी आहेत का ते पहावे शक्यतो आपल्या आयडी  प्रूफ मध्ये चुका नसाव्यात काही तांत्रिक चुका असल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात तसेच यावेळी मतदार नोंदणी संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आदी विषयावरून मार्गदर्शन केले   यावेळी महिलांशी संवाद साधला तसेच महिलांच्या विविध विषयावर अडचणी समस्या वर मार्गदर्शन केले यावेळी श्री ठाकूर श्री पवार यांनीही मनोगत व्यक्त केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages