13 गावांसह रोपळे शिवारात दहिगाव योजनेचे पाणी येणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 6, 2024

13 गावांसह रोपळे शिवारात दहिगाव योजनेचे पाणी येणार

 13 गावांसह रोपळे शिवारात दहिगाव योजनेचे पाणी येणार

 पंचक्रोशित आ.संजयमामा शिंदे यांची जलपुरूष अशी ख्याती


कुर्डूवाडी(कटूसत्य वृत्त ):- करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंदनलिका वितरण प्रणालीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या कामामुळे योजनेच्या मूळ मंजूर असलेल्या 1.81 टीएमसी पाण्यामधून जवळपास 0.46 टीएमसी पाण्याची बचत होणार असल्यामुळे हे बचत झालेले पाणी योजनेच्या लगत असलेल्या इतर 13 गावांना मिळावे यासंबंधी सर्वेक्षणाचे आदेश  संबंधितांना द्यावेत अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली. त्यानुसार फडणवीस यांनी या संबंधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यामुळे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित असलेल्या 13 गावांना या पाण्याचा फायदा होणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. आ. शिदे यांच्यामुळे 36 गावापैकी रोपळे शिवारात देखील दहिगाव योजनेचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परिसरात आ.शिंदे यांना जलपुरूष अशी ख्याती मिळत आहे. 

              दहिगाव उपसा सिंचन सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी योजना असून या योजनेसाठी 1.81 टीएमसी पाणी मंजूर आहे .सध्या या योजनेचे बंद नलिका वितरण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून या कामामुळे एकूण मंजूर पाण्यापैकी 0.46 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

         या बचत झालेल्या पाण्यातून मतदार संघातील वंचित असलेली झरे ,देवळाली ,फिसरे, हिसरे ,अर्जुननगर सालसे, निंभोरे, मलवडी ,वडशिवणे, पाथुर्डी, वरकुटे, म्हसेवाडी,रोपळे ही गावे समाविष्ट करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यानुसार लवकरच सर्वेक्षणाचे आदेश निघून प्रत्यक्षात सर्वेक्षणाचे काम सुरू होईल.

    मामांनी पाणी दिलं आता मतं द्यायची जबाबदारी आमची

    आम्ही आ.संजयमामा शिंदे गटात प्रवेश करताना पाणी आणी गावातील मलभुत गरजा या मुद्यावर चर्चा करुन प्रवेश केला होता. मामांना विधानसभेनंतर पाणी प्रश्न मांडणार होतो पण मतांनी विधानसभेच्या आधीच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याचा मार्ग मोकळा केला . त्यामुळे आगामी विधानसभेला आम्ही मतांनी पाण्याच्या उपकाराची परतफेड करु. 

        श्रीपाद दळवे

         उपसरपंच - रोपळे 

    आ.शिंदे हे विकासरत्न ठरठरत आहेत . बेंद ओढ्यात  सिना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मंजुरी मिळाली . त्यानंतर दहिगाव उपसा सिंचन योजनेतून नविन तेरा गावांना शिल्लक पाणी मिळणार आहे. आमच्या रोपळे गावाला न्याय दिल्या बद्दल आ संजयमामा शिंदे यांचे आभारी आहोत.

                    अजिनाथ गोडगे

           आ.शिदे गट नेते रोपळे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages