छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे, खा प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, मा. नगरसेवक नाना काळे, माजी सभापती राजन जाधव, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मा. नगरसेवक विनोद भोसले, प्रा. नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हेमाताई चिंचोळकर, सिद्धाराम चाकोते, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, पशुपती माशाळ, राज सलगर, लखन गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, वसिष्ठ सोनकांबळे, श्रीशैल रणधिरे, जितू वाडेकर, सुनील व्हटकर, बापू घुले ,श्रीकांत गायकवाड, गौतम मसलखांब, राजन कामत, रमेश जाधव, जीतराज गरड, चंद्रकांत टीक्के, शाहू सलगर, सुमन जाधव, संध्या काळे, भाग्यश्री कदम, अभिलाष अच्युगटला, मोहसीन फुलारी, चंद्रकांत नाईक, सौरभ साळुंखे, बसू कोळी, रुकैयाबानु बिराजदार, शोभा बोबे, सुनील डोळसे, सुरेखा पाटील, निशा मरोड, प्रियांका गुंडला, यांच्यासह इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
0 Comments