लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रदीप आदलिंगे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, कार्य याविषयी सांगताना त्यांच्याकडून आपण उत्तम नियोजन, नेतृत्व, दुरदृष्टी, नम्रपणा, सामाजिक भान या गोष्टी शिकायला पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. वैभव बाबर व प्रा पुनम उंबरे यांनी विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, कार्य तसेच एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थीनी राधिका घुगे व श्रेया टकले आदींनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे जीवनप्रवास व कार्य विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सोहम बोधले यांनी व आभारप्रदर्शन ओम पवार यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. सागर महाजन, प्रा सायली बडेकर, प्रा वर्षा मानेदेशमुख तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments